महाराष्ट्रातून सौंदत्ती यात्रेला जाणाऱ्या एस.टी. दरात, कर्नाटक एस.टी. दरात फरक का ?

महाराष्ट्रातून सौंदत्ती यात्रेला जाणाऱ्या एस.टी. दरात, कर्नाटक  एस.टी. दरात फरक का ?

कोल्हापूर :  १२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या सौंदत्ती यात्रा होत आहे.  महाराष्ट्रातून सौंदत्ती यात्रेला जाणाऱ्या एस.टी. दरात आणि कर्नाटक  एस.टी. दरात फरक का ? असा सवाल करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन विभागीय नियंत्रकांना  देण्यात आले आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक यांचा एक एसटी ४९/- रु. किलोमीटर प्रमाणे ३०० किलोमीटर  ४८ तास वाहन देते. म्हणजेच ४९ x  ३०० = १४ ,७००/- व एक एसटी व ५० सीट हे जर कर्नाटक देऊ शकते तर मग महाराष्ट्र का नाही. ही होणारी यात्रा अखंड कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूरापासून असणारे सर्व खेड्यात होत असते. माघ पौर्णिमेला चालणाऱ्या यात्रेसंदर्भात जे  सरकारने ग्रामीण यात्रेसाठी जाहीर केलेले ४ दिवसांचे दरपत्रक दिले आहे ते आम्हाला १ ते २० दिवसाकरिता आपल्या सरकारकडून मान्य करुन द्यावे  आणि यात्रेमध्ये मिळणारा महसुल आपल्या महाराष्ट्र सरकारला मिळावा.

लवकरात लवकर वरीलप्रमाणे दरपत्रक मिळावे नाही तर संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी  संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील, किरण मोरे, प्रशांत खाडे, मंगल महाडीक आदी उपस्थित होते.