भारत पाकिस्तानवर पडला भारी ; भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा हल्ला परतवला..

माझा महाराष्ट्र ऑनलाईन डेस्क - आज संध्याकाळच्या सुमारास पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ला करण्यात आला. मात्र, भारताच्या अत्याधुनिक एअर डिफेन्स प्रणालीने हे सर्व हल्ले यशस्वीपणे परतवून लावले.
या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने लाहोर शहरावर ड्रोनद्वारे लक्ष्य केले असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने भारतावर सुमारे 60 ड्रोन हल्ले केल्याचेही वृत्त आहे. तसेच, पाकिस्तानकडून लढाऊ विमाने वापरूनही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारताच्या सुरक्षादलांनी JF-17, F-16 आणि आणखी एक फायटर जेट यांचा नाश केला आहे.