Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति इलॉन मस्क यांनी बदलले नाव

Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति इलॉन मस्क यांनी बदलले नाव

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि एक्स, टेस्लासारख्या कंपन्यांचे प्रमुख इलॉन मस्क हे नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता आणखी एका मुद्द्यावरून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ते नेहमी समाज माध्यमांवर अशा काही गोष्टी करत असतात, ज्यामुळे त्यांची समाजमाध्यमांवर बरीच चर्चा होत असते. आता देखील असाच एक मुद्दा त्यांचा चर्चेचा विषय बनला आहे. 

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी आपले नाव बदलले आहे. त्यांनी आपले हे नाव कागदोपत्री बदलले, नसले तरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मस्क मात्र, त्यांनी आपले नाव बदलून “केकियस मॅक्सिमस” असे केले आहे. त्यांनी आपला प्रोफाईल पिक्चरदेखील बदलला असून, त्याजागी ‘पेप द फ्रॉग’ मीमचा फोटो लावला आहे. यामध्ये पेप द फ्रॉगने योद्ध्याचे कपडे घातले असून, त्याच्या हातात गेम जॉयस्टिक दिसत आहे. 

“केकियस मॅक्सिमस” या नवीन नावाचा अर्थ काय 

इलॉन मस्क यांनी एक्सवर आपल्या नावाऐवजी “केकियस मॅक्सिमस” नाव ठेवले आहे. “केकियस मॅक्सिमस” हे एक क्रिप्टोकरन्सी टोकन आहे, जे एथीरियम आणि सोलानावर आधारित आहे. विशेष म्हणजे, इलॉन मस्क यांनी आपले नाव “केकियस मॅक्सिमस” ठेवल्यानंतर या टोकनला अचानक गती मिळाली अन् अवघ्या 24 तासात त्याचे मूल्य 500 टक्के वाढले आहे. या क्रिप्टोकरन्सी टोकनेचे मूल्य सुमारे 30 लाख रुपयांपर्यंत वाढले आहे. दरम्यान, इलॉन मस्क यांनी यापूर्वी Dogecoin बाबत असेच केले होते. त्यावेळीही या करन्सीचे मूल्य अनेक पटीने वाढले होते.