लोकराजा शाहू महाराज यांच्या कार्याचे पोस्टर घेऊन कार्यकर्त्यांनी लोकहिताचा संदेश दिला

लोकराजा शाहू महाराज यांच्या कार्याचे पोस्टर घेऊन कार्यकर्त्यांनी लोकहिताचा संदेश दिला

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राजर्षी शाहू महाराज यांची 151 वी जयंती शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाहू महाराज यांनी केलेल्या लोककल्याणकारी कामांना उजाळा देण्यात आला. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जाण्याचा संकल्प काहींनी केला. शाहू महाराज यांनी आरक्षणापासून ते जनतेच्या कल्याणासाठी शाहू महाराज यांनी अनेक लोककल्याणकारी कामे केली आहेत त्यामुळे त्यांना लोकराजा या नावानेही संबोधले जाते. लोकराजा शाहू महाराज यांच्या कार्याचे पोस्टर घेऊन कार्यकर्त्यांनी लोकहिताचा संदेश दिला. 

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त ऐतिहासिक कळंबा तलावामध्ये शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कळंबा तलाव संरक्षण व संवर्धन आंदोलन यांच्या वतीने करण्यात आले. 

यावेळी कळंबा गावच्या उपसरपंच पूनम जाधव, ग्रामसेवक विलास राबाडे, अध्यक्ष संग्राम जाधव, महापालिकेचे उत्तम जाधव, निमंत्रक प्रकाश टोपकर, सुहास निकम, संदीप जाधव, प्रकाश पवार, अशोक बराले, गजानन जाधव आदी उपस्थित होते.