राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस को - ऑपरेटिव्ह बँकेमध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची 151 वी जयंती उत्साहात संपन्न

राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस को - ऑपरेटिव्ह बँकेमध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची 151 वी जयंती उत्साहात संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये लोकराजा  छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 151 वी जयंती उत्साहात पार पडली. राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला बँकेचे अध्यक्ष मधुकर पाटील (एम.एस) यांच्यासह सर्व संचालकांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. शाहू महाराज यांना आदरांजली वाहून अध्यक्ष मधुकर पाटील (एम.एस) यांनी आपल्या मनोगतामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेने व  ना.  भास्करराव जाधव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् बँकेने सभासद व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. बँकेने उल्लेखनिय कामगिरी करीत " 108 " वर्षांचा टप्पा पार केला असलेचे नमूद करून इतर बँकेच्या तुलनेत बँकेने केलेली लक्षणीय प्रगती सातत्याने अशीच टिकवून ठेवण्याची ग्वाही दिली.

यावेळी उपाध्यक्ष अरविंद आयरे, संचालक सर्वश्री रविंद्र पंदारे, शशिकांत तिवले, अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, विलासराव कुरणे, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, अजित पाटील, संचालिका हेमा पाटील, मनुजा रेणके, संचालक संजय खोत, किशोर पोवार, प्रकाश पाटील, तज्ञ संचालक दिपक पाटील, गजानन भालकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे व बँकेचे सभासद तसेच कर्मचारी उपस्थित होते.