दहिसरमध्ये धक्कादायक घटना ; १२ वर्षाच्या मुलाकडून हवेत गोळीबार

दहिसरमध्ये धक्कादायक घटना ; १२ वर्षाच्या मुलाकडून हवेत गोळीबार

मुंबई - दहिसर पूर्वेच्या वैशालीनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी (२७ जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास १२ वर्षाच्या मुलाने हवेत गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली. संबंधित मुलाला ही लोडेड बंदूक कचऱ्यात सापडली होती, असे त्याने सांगितले.

मुलाने ती बंदूक खेळण्याची समजून उचलली आणि चुकून ट्रिगर दाबला, ज्यामुळे हवेत गोळी झाडली गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जखमी झालेली व्यक्ती नाही.

घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बंदूक ताब्यात घेतली. मुलाची चौकशी करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, ही बंदूक कचऱ्यात कोणी आणि का फेकली, याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईकृपा चाळीजवळील घटनपाडा नंबर २ भागात ही बंदूक बेवारस अवस्थेत सापडली होती. यामुळे परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पालकांनी मुलांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.