मनमोहन सिंग यांच्या निधनाने बॉलीवूडही हळहळले...भारताने गमावला सर्वोत्तम पंतप्रधानांपैकी एक पंतप्रधान

मनमोहन सिंग यांच्या निधनाने बॉलीवूडही हळहळले...भारताने गमावला सर्वोत्तम पंतप्रधानांपैकी एक पंतप्रधान

मुंबई: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. मनमोहन सिंह यांच्या निधनाबाबत सिने कलाकारांनीही दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कपिल शर्मा सोबतच रितेश देशमुख, सनी देओल, रवी किशन, आणि दिशा पाटानी यांनी मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी समजताच भावनिक श्रद्धांजली वाहिली. 

भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणारी व्यक्ती : रितेश देशमुख 

रितेश देशमुखने त्याचे दिवंगत वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे मनमोहन सिंह यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. मनमोहन सिंह यांना ते पुष्पगुच्छ देत होते. रितेशने पोस्टमध्ये लिहिले की, 'आज आपण भारताच्या सर्वोत्तम पंतप्रधानांपैकी एक गमावला आहे. भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणारी व्यक्ती होती ती. ते प्रतिष्ठेचे आणि नम्रतेचे प्रतीक होते. त्यांच्या वारशाचे आम्ही सदैव ऋणी राहू. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.'

भारताच्या आर्थिक उदारीकरणाला आकार देणारे पंतप्रधान :  सनी देेओल 

भारताच्या आर्थिक उदारीकरणाला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावणारे दूरदर्शी नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांची सचोटी आणि देशाच्या विकासातील योगदान सदैव स्मरणात राहील.मनपूर्वक श्रध्दांजली. 

देशाला त्यांची खूप आठवण येईल- दिशा पाटानी 

दिशा पाटानीनेही मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. तिने ट्विट केले की, 'माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट करणारे दूरदर्शी नेते होते. त्यांचे ज्ञान आणि योगदान सदैव स्मरणात राहील. देशाला त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्या कुटुंबीयांसाठी माझ्या संवेदना.

रवी किशन : 'माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाची दु:खद बातमी मिळाली. प्रभू श्री राम या पुण्यवान आत्म्यास त्यांच्या चरणी स्थान देओ ही विनंती.

२६ डिसेंबर रोजी एम्समध्ये झाले निधन 

मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २६ डिसेंबरच्या संध्याकाळी त्यांना बेशुद्ध अवस्थेत दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. मात्र रात्री ९.५१ वाजता त्यांचा मृत्यू झाला.