मराठा -कुणबी समाजाचा पुरातन कालीन पुरावा विश्वास पाटील (पानिपतकार)यांनी सादर केली माहिती

मराठा -कुणबी समाजाचा पुरातन कालीन पुरावा  विश्वास पाटील (पानिपतकार)यांनी सादर केली माहिती

सिंधुदुर्ग प्रतिनिधी-नारायण लोहार 

कुडाळ-दि.31ऑक्टोबर-

पानिपतकार विश्वास पाटील यांच्या मते 1881 मध्ये भारतामध्ये ब्रिटिशांनी पहिला शास्त्रशुद्ध असा जनगणनेचा प्रयोग राबवला. याची सुरुवात 1872 मध्ये लॉर्ड_माओ यांनी केली. मात्र खऱ्या अर्थी पहिला शास्त्रशुद्ध सायंटिफिक सर्वे 1881 मध्ये झाला. त्यासंबंधीची सर्व #गॅझेटइयर्स 1884 च्या दरम्यान प्रकाशित करण्यात आली. ज्यामध्ये या देशाचा इतिहास, संस्कृती, भूगोल आणि भविष्याची आखणी करण्याच्या दृष्टीने लोकसंख्या व व्यावसायिकांची तसेच नैसर्गिक संपत्ती, पिके, इतर उत्पन्न या सर्वांचा धांडोळा ब्रिटिशांनी घेतला होता.

ब्रिटिशांचा हा सर्वे फक्त जिल्हावार नसून ,प्रत्येक उपविभाग म्हणजेच सब- डिव्हिजन ज्याला आपण प्रांत म्हणतो अशा स्तरापर्यंत माहिती या सर्वे मध्ये मिळते.

उदाहरणार्थ आपण पुणे जिल्ह्यातील मावळ ह्या सब- डिव्हिजनचा म्हणजेच प्रांताचा जनगणनेचा 1881 चा आकडा पाहू. त्यानुसार खालील प्रमाणे गणसंख्या होती.

मावळ सब डिव्हिजनची एकूण लोकसंख्या 59 हजार 674 पैकी मुसलमान ६१२ ख्रिश्चन 70 पारसी 70 , ज्यू 50, ब्राह्मण 2885, 76 कायस्थ प्रभू, पाठारे प्रभू 22, मारवाड वाणी 626, 252 लिंगायत, वैश्य वाणी 42, अग्रवाल पाच, कुणबी 32115, माळी 579, चांभार 1237, कुंभार 535, सोनार 489, लोहार 92, गुरव 671, वंजारी 103, महार 8948, मांग 436, गोंधळी 23 . माळी 579 इत्यादी.

माझे अभ्यासक मित्र श्री मराठे यांनी अधिक माहिती दिल्याप्रमाणे हा जातवार व धर्मवार सर्वे 1931 पर्यंत सुरू होता..

एकूणच या देशाचा अभ्यास, जाती, धर्म ,पिके ,संपत्ती अशा अनेक ट्रेंडमधून करायचा झाला तर 1881 ते 1931 पर्यंतचे सर्वे रेकॉर्ड सर्वांनाच खूप उपयोगी ठरणारे आहे.

हाच फरक आहे ब्रिटिशकालीन आयसीएस अधिकाऱ्यांमध्ये आणि आजच्या प्रशासकीय दुनियेमध्ये.

–विश्वास पाटील