जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हापरिषद प्राथमिक शाळा नंबर ०४ मधील विद्यार्थिनींना मार्गदर्शन व सत्कार सोहळा संपन्न
अमित वेंगुर्लेकर
जिल्हापरिषद प्राथमिक शाळा नंबर ०४ मधील विद्यार्थिनींना मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन सिंधुदुर्ग जिल्हा महिलाध्यक्ष माननीय सौ.नीलम गवस यांनी आरोग्य व सामाजिक ज्ञान विषयक मार्गदर्शन केले.तसेच सदर प्रशालेतील शिक्षिका सौ. कविता धुरी,सौ.प्रणिती सावंत,सौ.सुजाता पवार,श्रीमती लक्ष्मी धारगळकर,यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षण देवून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यासाठी सहकार्य केले आहे.तसेच सदर जिल्हापरिषद प्राथमिक शाळेस आय एस ओ मानांकन मिळवून देण्यासाठी सर्व शिक्षक वर्ग यांनी सहकार्य केलं आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त अशा या कर्तृत्ववान महिला भगिनीचा शाल,श्रीफळ,प्रशस्तीपत्रक व गुलाब पुष्प देवून मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन व सिंधुदुर्ग जिल्हा मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन महिला पदाधिकारी यांच्यातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.सदर प्रसंगी शाळा नंबर ०४ चे शिक्षक वर्ग,मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन तर्फे प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री रिजवान बाडीवाले, रमिज मुल्ला, आबिद कित्तूर्,शाहबाझ शेख,संजय गावडे,संतोष तळवणेकर, डी ई एस पारधी,परेश सोंसुरकर,महिला जिल्हाध्यक्षा सौ.नीलम गवस, जरीना शेख,सानिया शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते