‘माझा महाराष्ट्र’ इम्पॅक्ट; अखेर महापालिकेने नवीन फलक लावला...

‘माझा महाराष्ट्र’ इम्पॅक्ट; अखेर महापालिकेने नवीन फलक लावला...
अखेर कोल्हापूर महापालिकेने नवीन फलक लावला...

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

‘माझा महाराष्ट्र’ने प्रसारित केलेल्या बातमीचा अखेर कोल्हापूर महापालिकेने पाठपुरावा केला असून गेल्या अनेक दिवसांपासून फाटलेल्या अवस्थेत असलेले छत्रपती शाहू महाराजांचे फलक महापालिकेकडून बदलण्यात आले आहे. 

कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील स्वागत कमानीवर लावण्यात आलेला छत्रपती शाहू महाराजांचा डिजिटल फलक काही दिवसांपासून दुर्लक्षित अवस्थेत होता. महापालिका प्रशासनाच याकडे दुर्लक्षच होतं होते. ते फलक तात्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी शाहू प्रेमींकडून केली जात होती. याबाबत नुकतीच ‘माझा महाराष्ट्र’ने एक बातमी प्रसारित केली होती. याची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली असून याठिकाणी नवीन फलक लावण्यात आला आहे. त्यानंतर आता नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.