दौलतराव निकम विद्यालयाचे 15 विद्यार्थी स्काऊट गाईड राज्यपाल पुरस्कार प्राप्त

दौलतराव निकम विद्यालयाचे 15 विद्यार्थी स्काऊट गाईड राज्यपाल पुरस्कार प्राप्त

पत्रकार- सुभाष भोसले

        कोल्हापूर भारत स्काऊट आणि गाईड्स यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्काऊट गाईड राज्यपाल पुरस्कार परीक्षेत व्हन्नूर ता.कागल येथील श्री.दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय या प्रशालेतील आठ स्काऊट व सात गाईड यांना घवघवीत यश प्राप्त झाले असून त्यांना राज्यपाल पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्यामध्ये पौर्णिमा कृष्णात सावंत,मृणाल मानसिंग वठारे,समीक्षा शिंगू हजारे,गौरी महादेव पाटील,नेहा राजेंद्र पाटील,मधुरा संभाजी निकम,अंजली दिलीप मेंगाणे या गाईड तर अरिहंत रावसो खोत,निरंजन दीपक जाधव,अथर्व अनिल लोंढे,अनिकेत अजित खापणे,अविष्कार लक्षमण लोंढे,पार्थ बळीराम जाधव,ओंकार अरुण जाधव,साईराज संदीप खोत या स्काऊट विद्यार्थ्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे.

         या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्षा श्रीमती सुनंदा निकम व मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांची प्रेरणा तर गाईड प्रमुख एम.जी.मोरे व स्काऊट प्रमुख बी.जी.बोराटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे