शिवाजी विद्यापीठ विभागीय व अंतर विभागीय जलतरण स्पर्धेत केआयटी ने मिळवले घवघवीत यश
कोल्हापूर प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ विभागीय व अंतर विभागीय जलतरण कोल्हापूर येथील स्पर्धा शाहू कॉलेज, कोल्हापूर यांनी आयोजित केल्या होत्या. सदरच्या दोन्ही स्पर्धेत केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेचा निकाल सोबत पाठवलेला आहे.
पृथ्वीराज सासणे, इंद्रजीत परमेकर, ओंकार इंगळे, चिन्मय जोशी या विद्यार्थ्याच्या संघाने हे घवघवीत यश मिळवले
स्पर्धेत सहभागी असलेल्या खेळाडूंचे अभिनंदन महाविद्यालयाचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केले. सोबत मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर,अधिष्ठाता विद्यार्थी उपक्रम डॉ.जितेंद्र भाट, शारीरिक शिक्षण संचालक विजय रोकडे उपस्थित होते.
खेळाडूंना संस्थेचे चेअरमन साजिद हुदली, व्हा. चेअरमन सचिन मेनन, सेक्रेटरी दीपक चौगुले यांचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.
पृथ्वीराज अमर सासणे
५० , १००, २०० बॅक स्ट्रोक :- पहिले स्थान
१०० फ्री स्टाइल :- तिसरे स्थान
२०० फ्री स्टाइल:- चौथे स्थान
४ x १०० फ्री स्टाइल रिले :- पहिला
४ x १०० मिडले रिले :- पहिला
४ x २०० मिडले रिले :- पहिला
इंद्रजीत उमेश परमेकर
१०० ब्रेस्ट स्ट्रोक:- दुसरे स्थान
४ x १०० फ्री स्टाईल रिले :- पहिला
४ x १०० फ्री स्टाईल रिले :- पहिला
४ x २०० मिडले रिले :- पहिला
इंगळे ओंकार मारुती
४ x १०० फ्री स्टाईल रिले :- पहिला
४ x १०० मिडले रिले :- पहिला
४ x २०० फ्री स्टाईल रिले :- पहिला
५० ब्रेस्ट स्ट्रोक :- दुसरा
२०० ब्रेस्ट स्ट्रोक :- दुसरा
चिन्मय मिलिंद जोशी
४ x १०० फ्री स्टाईल रिले :- पहिला
४ x १०० मिडले रिले :- पहिला
४ x २०० फ्री स्टाईल रिले :- पहिला
४०० वैयक्तिक मिडले :-तिसरा