शरद स्कॉलर परिक्षा २५ व २९ डिसेंबरला

शरद स्कॉलर परिक्षा २५ व २९ डिसेंबरला

कोल्हापूर प्रतिनिधी :  येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याच्यावतीने बारावी सायन्सच्या सन २०२४-२५ विद्यार्थ्यांसाठी ‘शरद स्कॉलर २०२५’ या परिक्षा बुधुवार (ता.२५) रोजी राज्यातील विविध जिल्ह्यातील केंद्रावर होणार आहेत. तसेच दहावींच्या विद्यार्थ्यांकरीता शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निककडून ‘‘शरद मॅथ्स स्कॉलर'' परिक्षा रविवार (ता.२९) रोजी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात होणार आहेत. 

बारावींच्या विद्यार्थ्यांकरीता घेण्यात येणा-या परिक्षेत विजेत्यांना १ लाख रुपयांसह अनुक्रमे ५० हजार, ४० हजार, ३० हजार व २० हजार रुपये बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम विद्यार्थ्यास १० हजार रुपये व इतर पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांचे बक्षिस आहे. परिक्षा हि बहुविकल्पीय (MCQ) प्रश्न असून एकूण ७५ प्रश्न असतील. मॅथ्स २५ (५० गुण), फिजिक्स २५ (२५ गुण) केमिस्ट्री (२५ गुण) असतील. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे.

बारावी विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर, इंचलकरंजी, मुरगुड, राधानगरी, आजरा, गडहिंग्लज, सोलंकुर, नुल, मुधाळतिट्टा, गारगोटी, चंदगड, जयसिंगपूर, सांगली, मिरज, जत, सोनंद, इस्लामपूर, तासगांव, म्हैशाळ, पुणे, रत्नागिरी, खेड, निपाणी, सदलगा या केंद्रावर परिक्षा होणार आहेत. 

दहावींच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ३५ हजार, २५ हजार व १५ हजार रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. त्यामध्ये ५० बहुविकल्पीय प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत. हि परिक्षा इंग्रजी व मराठी अशा दोन्ही माध्यमात घेतली जाणार आहे. परिक्षा यड्राव (इचलकरंजी), कोल्हापूर, हुपरी, पुलाची शिरोली, चिंचवाड, तळसंदे, सडोली सांगली, मिरज, म्हैशाळ, कवलापूर, आरग-बेडग, कुपवाड, कवठे गुलंद केंद्रावर होणार आहेत.