मुंबईचा यावर्षी पहिल्या सामन्यात पराभव... सलग १२ वर्ष पहिला सामना गमवला

मुंबईचा यावर्षी पहिल्या सामन्यात पराभव... सलग १२ वर्ष पहिला सामना गमवला

IPL चा दुसरा सामना मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये रंगला. IPL मधील मुंबईच्या पहिल्याच सामन्यात मुंबईवर गुजरातने मात करत विजय मिळवला. सलग १२व्या वर्षी देखील मुंबईला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. २०१३ पासून मुंबईच्या संघाने सलग १२वर्ष पहिला सामना गमावला आहे.

 मुंबईच्या फलंदाजांची झुंज यावेळी अपयशी ठरली मात्र मुंबईकडून जसप्रीत बूमराहची चमकदार कामगिरी बघायला मिळाली. १२ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या एका विकेटवर १०७ धावा होती. तेथून गुजरातने सामन्यात पुनरागमन करत सामन्यात मुंबईला ९ विकेट्सवर केवळ १६२ धावांवर रोखले.

रोहित शर्मा नंतर मुंबईची कमान हातात घेतलेल्या पांड्याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याने बूमराहऐवजी स्वतः गोलंदाजी केली. पांड्याने या षटकात ११ धावा खर्च केल्या त्यामुळं गुजरातने दमदार सुरवात केली. मात्र,चौथ्या षटकात बुमराहने यॉर्करवर वृद्धिमान सहाला आऊट केले 

आक्रमक फलंदाजी करणारा शुभमन गिल मुंबईसाठी डोकेदुखी ठरला होता. मात्र, पियुष चावलाने गोलंदाजी करत त्याला बाद केले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीने अजमतुल्ला ओमरझाई याला बाद केले तर बुमराहने डेव्हिड मिलर आणि सुदर्शनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

मुंबई इंडियन्सला पहिल्याच षटकात इशान किशन खाते न उघडता बाद झाला. पदार्पण करणारा नमन धीर तिसऱ्या क्रमांकावर येत शानदार फलंदाजी करत १० चेंडूत २० धावा केल्या. तिसऱ्या षटकात तीन चौकार आणि एक षटकार मारल्यानंतर धीर शेवटच्या चेंडूवर अजमतुल्ला उमरझाईचा बळी ठरला. यानंतर रोहित शर्मा आणि देवाल्ड ब्रेविस या दोघांनी ५५ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. अखेरच्या ओव्हर मध्ये मुंबईला  6 चेंडूत मध्ये 19 धावांची गरज होती. मात्र मुंबईच्या खराब बॅटिंग फॉर्ममुळे मुंबईला हे लक्ष पार करता आले पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे .