राजकारणात सगळेच राहतात!फडणवीसांचा ठाकरेंना संयमी टोला
मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी 'लाडकी बहीण' योजना, पुढील पाच वर्षांसाठीच्या धोरणांचा रोडमॅप, आणि विरोधकांशी शत्रुत्व नसल्याचा पुनरुच्चार केला.
उद्धव ठाकरे यांनी जुलै महिन्यात रंगशारदा सभागृहातील मेळाव्यात फडणवीसांवर गंभीर आरोप करत "एक तर तू राहशील किंवा मी राहीन" असे वक्तव्य केले होते. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "राजकारणात सगळेच राहतात, हेच महाराष्ट्राची परंपरा आहे."
फडणवीसांनी यावेळी महाराष्ट्राच्या राजकीय संवादाची प्रगल्भता जपण्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, "इतर राज्यांतील राजकीय कटुता इथे येऊ देणार नाही. राजकीय मतभेद असतील पण संवाद आणि सहकार्य कायम राहील."