HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राधानगरी तालुक्यातील 'या' सात गावांना भूस्खलनाचा धोका

राधानगरी तालुक्यातील 'या' सात गावांना भूस्खलनाचा धोका
तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडून गावांची पाहणी

विजय बकरे / राधानगरी प्रतिनिधी : 

राधानगरी तालुक्यातील सात गावांना भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांना राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख यांनी नुकतीच सात गावांना भेट दिली आहे.

राधानगरी तालुक्यामध्ये गेली पाच-सहा दिवस पावसाचा जोर वाढत असल्याने राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी कासारवाडा पैकी धनगरवाडा, कासार पुतळे, धामणवाडी, अवचितवाडी,  हनबरवाडी, पकालेवाडी या सात गावांना नुकतीच भेट दिली.

या गावांना भूस्खलनाचा धोका असल्याने त्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना किंवा जीवितहानी होऊ नये म्हणून गाव पातळीवर गस्त घालण्यात यावी अशा सक्त सुचना देशमुख यांनी ग्रामस्थांना देण्यात आल्या. गावातील लोकांनी सतर्क राहून एखादी दुर्घटना घडल्यास माझ्याशी किंवा सर्कल तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही अनिता देशमुख यांनी केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.