रायगड जिल्ह्यात दिवाळी आनंदाचा शिधा सर्वप्रथम आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मभूमी शिरढोण येथे वाटण्यात आला .
पनवेल प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन, अन्न व नागरी पुरवठा विभाग यांनी घोषित केलेला दिवाळी सणानिमित्त शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा हा खूप महत्त्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे. या शिधा मध्ये १ किलो साखर , १ लिटर खाद्यतेल, अर्धा किलो रवा, अर्धा किलो चणाडाळ, अर्धा किलो मैदा तसेच अर्धा किलो पोहे देखील महाराष्ट्र शासन वाटप करणार आहे. गोरगरीब जनतेसाठी खरोखर हा आनंदाचा शिधा ठरेल.
दिवाळी सणानिमित्त गोरगरीब जनतेमध्ये आनंदाचा शिधा वाटप देशाचे पहिले क्रांतिकारक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मभूमी शिरढोण गावामध्ये सर्वप्रथम वाटप करण्यात यावा. अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी रायगड योगेश म्हसे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी पनवेल विजय पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. केलेल्या मागणीला विलंब न करता दिनांक ९/११/२०२३ रोजी सर्वप्रथम आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच जन्म गाव शिरढोण येथील स्मारकामध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. मोठ्या उत्साहाने गावकरी आनंदाचा शिधा घेण्यासाठी जमले होते... सावित्रीबाई महिला बचत गट या महिला बचत गटाच्या माध्यमातून दिवाली सणाचा शिधा वाटपाचे कार्यक्रम करण्यात आले.
या कार्यक्रम मध्ये सर्जेराव सोनावणे जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड अलिबाग विजय पाटील तहसीलदार, प्रदीप कांबळे पुरवठा निरीक्षक अधिकारी,पनवेल रायगड निरीक्षण अधिकारी राहुल मुंडके साहेब प्रांत अधिकारी पनवेल रायगडकृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राम शेठ भोईर
छावा क्रांतिवीर सेना रायगड जिल्हा अध्यक्ष रोशन महादेव पवार,निलेश जामकर ग्रामपंचायत सरपंच, वैशाली ऋषिकेश भोईर.
उपसरपंच वैभव, उपसरपंच प्रीती प्रशांत गायकवाड, पुनम दत्तात्रय मुकादम, अनिता दत्तात्रय जळे, कुमार वाजेकर, प्रशांत हिरामण गायकवाड, रामदास पवार, बालकृष्ण पवार,दिनेश भोपी,रश्मी दिनेश भोपी, दिलीप भोपी,विनोद ठेकेकर, स्वप्निल मुकादम, कृष्णा भोपी, स्वप्निल जले, , प्रवीण वाजेकर, बालाराम म्हात्रे,
आधी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडला.....