रोटरी क्लबच्या नोकरी मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रोटरी क्लबच्या नोकरी मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटीव्हज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर मध्ये भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला विद्यार्थ्यांकडून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच विविध क्षेत्रातल्या २५ पेक्षा जास्त कंपणयानी या मेळाव्यात सहभाग घेतला होता, तसेच या मुलाखतींसाठी जवळपास २८६ विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामधून प्रत्यक्ष ४६० मुलाखती पार पडल्या. पैकी १३२ जणांची प्राथमिक स्वरूपात निवड करण्यात आली. रोटरी क्लब कडून वर्षभरात असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम  करण्यात येतात त्या माध्यमातून च युवकांच्या सोयीसाठी नोकरी मेळावा हा वर्षातून एकदा भरविण्यात येतो अशी माहिती रोटरी क्लब च्या वतीने देण्यात आली. त्याच बरोबर या मेळाव्यामध्ये महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत ४ महिला उद्योजिका यांचे विविध खाद्य पदार्थ व घरगुती मसाले यांचे स्टॉल लावण्यात आलें होते. 

 यावेळी  रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर चे सिद्धार्थ पाटणकर, संजीव चिपळूणकर, प्रदीप पासमल, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन चे शरद पाटील, रितू वायचळ, अनिकेत अष्टेकर, सचिन लाड,  इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटीव्हज ट्रस्ट चे संग्राम पाटील,  सुशांत चंदनशिवे, व वैभव उकर्डे यांनी या मेळाव्याचे यशस्वी नियोजन केले.