राजेविक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा- नवोदिता घाटगे

राजेविक्रमसिंह  घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा- नवोदिता घाटगे

कागल प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांना, राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांच्या वतीने सहकारातील आदर्श नेते  राजे विक्रमसिंह घाटगे  यांच्या नावाने दरवर्षी "आदर्श शिक्षक पुरस्कार"  दिला जातो.चालू वर्षीही हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने इच्छुकानी या पुरस्कारासाठी आपले   प्रस्ताव पाठवा. असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समिती  कागल च्या अध्यक्षा नवोदिता घाटगे  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  केले आहे. 

मागील सहा वर्षीपासून  गुणवंत शिक्षकांना राजे विक्रमसिंह घाटगे  आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.सन 2024च्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांचे जयंती दिनी म्हणजेच 28 जुलै 2024 रोजी करण्यात येणार आहे.प्राथमिक व माध्यमिक विभागात स्वतंत्र पुरस्कार देण्यात येतात, गुणांकन पद्धतीने शिक्षकांची निवड केली जाते.

तसेच चालू वर्षी, अंगणवाडी सेविका आशा वर्कर ,आदर्श बचत गट,यांचाही या पुरस्करा मध्ये समावेश केला आहे.शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती  सुहासिनीदेवी घाटगे व शाहू  राजे ग्रुप चे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पना व प्रेरणेतून  या पुरस्काराची सुरुवात केली आहे .

 प्रस्ताव फार्म मिळण्याचे व जमा करण्याचे ठिकाण. 

1) श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कागल(कारखाना शाळा) श्री.दिलीप निकम सर

2) सिध्दनेर्ली विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सिध्दनेर्ली श्री.भरत गुरव सर

3) राजे फाउंडेशन कार्यालय गडहिंग्लज व उत्तूर यांचेकडे मिळतील. प्रस्ताव विहित नमुन्यात  वरील संबंधित ठिकाणी मुदतीत द्यावेत. 

इच्छूक शिक्षकांनी आपले प्रस्ताव विहित नमुन्यात भरून दिनांक 4/07/2024 ते दिनांक 20/7/2024 पर्यंत वेळेत वरील ठिकाणी जमा करावेत. तसेच .......https://surveyheart.com/form/66826a87f665b477292d8ac0 या लिंकवर ऑनलाइन  प्रस्ताव सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे