वसंतरावदादा पाटील विद्यालय कांचनपूर येथे शेतकरी विद्यार्थी परिसंवाद आयोजित

वसंतरावदादा पाटील विद्यालय कांचनपूर येथे शेतकरी विद्यार्थी परिसंवाद आयोजित

संजय पवार / मिरज प्रतिनिधी 

माजी सैनिक शिक्षण संस्था संचलित कै. पद्म डॉक्टर वसंतराव दादा पाटील माध्यमिक विद्यालय कांचनपूर विद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न शेतकरी विद्यार्थी परिसंवाद हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चितळे उद्योग समूहाचे संचालक अतुल चितळे हे होते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर इयत्ता दहावीच्या मुलींनी स्वागत गीताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. संस्थेच्या उपाध्यक्ष्यांनी प्रमुख पाहुणे अतुल चितळे यांचा शाल श्रीफळ रोप व दीपस्तंभ पुस्तक देऊन सत्कार केला. 

यावेळी अतुल चितळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. अस्लम शेख यांनी सर्व शेतकरी बांधवांना तणनाशकाची माहिती दिली. शेतातील तणनाशके कशी कमी करता येतील यावर त्यांनी उपाय सांगितले. तर डॉ. सी. व्ही. कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी चितळे डेअरी यांनीही सर्व शेतकरी बांधव व विद्यार्थी विद्यार्थिनीना विनोदी शैलीमध्ये मुलामुलींना मार्गदर्शन केले. आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे. तेव्हा मुलांनी नोकरीकडे न वळता शेती व शेतीला पूरक असे व्यवसाय केले पाहिजेत. त्याचबरोबर फिल्मच्या माध्यमातून मार्गदर्शन केले त्याचबरोबर महाविद्यालयाच्या प्राचार्य शिंदे मॅडम आणि डॉक्टर दिनार पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.

त्याचरोबर वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र डॉ. दिनार पाटील, डॉ. सी. व्ही कुलकर्णी, चितळे डेअरीचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अस्लम शेख, शास्त्रज्ञ पीक संरक्षण डॉ. ए. ए. शिंदे, प्राचार्या एस. डी. कोरडे, डॉ ए.पी. खांडेकर, कृषी व्यवसाय तज्ञ, माजी सैनिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व आरग कारखान्याचे डायरेक्टर मोहनराव शिंदे, प्राध्यापक हंकारे मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील, मानमोडी सांबरवाडी कांचनपूर गावातील शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सूर्यवंशी सर यांनी केले व शेवटी माननीय श्री कोरडे मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.