सर्वोदय विद्यालयात विज्ञान दिन साजरा
majha maharashtra news

सर्वोदय विद्यालयात विज्ञान दिन साजरा
मिरज:- संजय पवार
सांगली येथील सर्वोदय विद्यालय राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विज्ञान शिक्षक राजीव कदम यांनी हा दिन का व कोणत्या नावाने साजरा केला जातो याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व सांगून कविता साजरे केली. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुचेता म्हेतर, संजय पवार, अशोक वाघमोडे, परशुराम रणधीर, शोभा सावंत, विजया ओंकार, सुधीर सोनार, विनोद साळुंखे, सचिन बाड, धनराज ठोंबरे उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रास्ताविक व स्वागत विज्ञान शिक्षक परशुराम रणधीर यांनी केले तर आभार नसीमा मुकादम यांनी मानले.