HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस; कोल्हापुरात आनंदोत्सव

विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस; कोल्हापुरात आनंदोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एक मताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल आज भाजपा जिल्हा कार्यालय या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला.भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्रजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत एकमेकांना लाडू भरवून हा आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे.सर्वसामान्य जनता आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस व्हावेत आज इच्छा पूर्ण होत आहे.आम्हाला अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने 2014 ते 19 च्या काळात महाराष्ट्र सगळ्या बाबतीत एक नंबर होता तसाच पुन्हा एकदा उद्योग, व्यापार, क्रीडा, पर्यटन,  आरोग्य असेल अशा सर्व क्षेत्रांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा भरारी घेईल.

याप्रसंगी महेश जाधव, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, हंबीरराव पाटील, गायत्री राऊत, डॉ. सदानंद राजवर्धन, विठ्ठल पाटील, संगीता खाडे, राजू मोरे, शैलेश पाटील, राजसिंह शेळके, भरत काळे, विशाल शिराळकर, गिरीष साळोखे, महेश यादव, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.