HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शरद इन्स्टिट्युटच्या शोधप्रकल्प संकल्पनेला ‘इशरे’कडून निधी

शरद इन्स्टिट्युटच्या शोधप्रकल्प संकल्पनेला ‘इशरे’कडून निधी

यड्राव :  यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांच्या शोध प्रकल्प संकल्पनेची देशपातळीवर निवड झाली असून पुढील कामासाठी निधीही मिळाला आहे. इंडियन सोसायटी ऑफ हिटींग रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कंडीशनिंग इंजिनिइअर्स (इशरे) यांच्याकडून देशातील विविध शोधप्रकल्पाच्या संकल्पनांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये शरदमधील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांच्या दोन संकल्पनेची निवड झाली आहे. सलग पाच वर्षापासून शरद इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेचा देशपातळीवर निवड होत आली आहे. यासाठी ९० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

‘इशरे’ या देश पातळीवरील रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कंडीशनिंग क्षेत्रात काम करणा-या नामांकीत सोसायटीने देशभरातील इन्स्टिट्युटकडून प्रकल्पाच्या संकल्पना मागविले होते. त्यामध्ये आय.आय.टी.सह नामांकित इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशभरातून १०० पेक्षा अधिक प्रकल्प संकल्पनांचा सहभाग होता. त्यामध्ये १३ संकल्पांची अंतीम निवड करण्यात आली आहे. 

यामध्ये मेकॅनिकल विभागातील सुमित मानगावे, चेतन पाटील, वेदांत यलजारे, अकिल मुजावर यांनी स्मार्ट अल्गी बायो पॅनेल्स: रिव्हॉल्युशनायझिंग HVAC विथ रिन्यूएबल एनर्जी अँड कार्बन सेस्ट्रेशन तर प्रतीक गुरव, सुमित मणगावे, ऋषिकेश शिरसागर, अभिजीत हनगंडे, वैभव झाडगे यांनी सौर सहाय्यक वाष्पीकरण प्रणालीद्वारे स्थिर जागा थंड करण्याचे उपाय, ज्यात छिद्रयुक्त पडदे आणि नॅनोफ्लुइड्सचा वापर हे प्रकल्प सादर केले. त्यांना प्रा. अवेसअहमद हुसेनी व प्रा. सुजित कुंभार यांचे मार्गदर्शन मिळाले. या संकल्पनेची प्रत्यक्ष प्रकल्पात रुपांतर व पुढील कामासाठी ९० हजार रुपयांचा निधी इशरेकडून मंजूर करण्यात आला आहे.

संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे अभिनंदन केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.