राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार व आचार्य अत्रे सर्वोकृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार व आचार्य अत्रे सर्वोकृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राजर्षी छत्रपती शाहु जयंती निमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने गुणवंत कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार व पत्रकारांसाठी आचार्य अत्रे सर्वोकृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार  26 जून रोजी सकाळी 11.30 वाजता राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर व नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड, आमदार जयंत असगावकर, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली आहे.