शाळाबाह्य कामामुळे शिक्षक त्रस्त !

शाळाबाह्य कामामुळे शिक्षक त्रस्त !

अशोक मासाळ / सांगली प्रतिनिधी 

शिक्षकांना शिकवण्याच्या कामापासून वंचित ठेवून शिक्षकांकडून अशैक्षणिक  कामे करून घेण्याचा सपाटाच शासनाने लावलेला आहे.आता आम्हाला शिकवू द्या असे म्हणण्याची वेळ शासनाने शिक्षिकांवर आणून ठेवली आहे.

शिक्षकांना प्रतिवर्षी स्टुडन्ट पोर्टल, सरलपोर्टल , शालार्थ  पोर्टल, यु डायस प्लस,विद्यार्थी आधार कार्ड काढणे व दुरुस्ती करणे आधार कार्ड अपडेट करणे, विद्यार्थी बँक खाते काढणे त्याचबरोबर मतदार नोंदणीची  कामे करणे असे अनेक कामे करावे लागतात 

शाळा १५ जून पासून सुरू झाली लगेचच १ जुलै ते २३ जुलै सेतू अभ्यासक्रम घेऊन त्यावर आधारित पूर्व चाचणी आणि त्यानंतर उत्तर चाचणी घेणे व त्या सर्व तपासून त्याचा निकाल तयार करणे हे काम संपत नाही

 तोपर्यंत १७ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट पायाभूत चाचणी व त्याचा निकाल लावणे लगेचच पुन्हा २१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट " नवरभारत निरक्षर  सर्वेक्षण " व शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली आहे .दरम्यान घटक चाचणी परीक्षा जवळ आली असून विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रम शिकवणेचे गरजेचे असताना बाहय कामांमुळे अभ्यासक्रम मागे पडत आहे याचा विचार न करता पुन्हा १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर अखेर "स्वच्छता सप्ताह " साजरा  करायचा आहे.

शाळा नाही चालली तर शिक्षक जबाबदार, गुणवत्ता नाही वाढली तर शिक्षक जबाबदार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील हजारो शिक्षक अशा अशैक्षणिक कामामुळे  बेजार झाले आहेत.

शासनाने शिक्षकांना त्याचे मुळ काम शिकवण्याचे आहे त्यांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम द्यावे व या सर्व अशैक्षणिक कामातून मुक्त करावे.