मिरजेचा आर्यन प्रसाद पुजारी सीबीएससी बोर्डात राज्यात दुसरा

मिरजेचा आर्यन प्रसाद पुजारी सीबीएससी बोर्डात राज्यात दुसरा

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ

मिरज :येथील मराठे मिल रोडवरील पुजारी हॉस्पिटल चे डॉ प्रसाद पुजारी व डॉ.अपर्णा पुजारी यांचा मुलगा आर्यन याने दहावीच्या सीबीएससी या केंद्रीय बोर्डात महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला आहे . त्याचे आजोबा वसंत दत्तात्रेय पुजारी जे पाणीपुरवठा खात्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्याच्या हस्ते आर्यनचा सत्कार करण्यात आला. वैद्यकीय पंढरीतील या डॉक्टर दांपत्याच्या मुलाला मात्र कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचे आहे. आर्यनने हे यश पोतदार स्कूलच्या मार्गदर्शनाने व केवळ घरच्या अभ्यासाने मिळवले .त्याची आई हीच त्याची गणित व विज्ञानाची तयारी करून घेत असे. 

आर्यनला गणित समाजशास्त्र व संस्कृत मध्ये शंभर पैकी शंभर मार्क मिळाले व विज्ञान आणि इंग्रजीमध्ये शंभर पैकी ९८ गुण मिळाले त्याला बोर्डाच्या परीक्षेत ९९.६०% गुण मिळाले.

आर्यन दररोज पहाटे पाच ला घड्याळाच्या गजर च्या साह्याने उठायचा. सकाळी दोन तास अभ्यास केल्यानंतर साडेसात ते तीन शाळेला जायचा. पुन्हा सायंकाळी साडेतीन ते साडेआठ पाच तास अभ्यास करायचा. व जेवणानंतर झोपण्यापूर्वी तो एक तास अभ्यास करायचा .सुट्टीच्या काळात तो दररोज सुमारे पंधरा तास अभ्यास करायचा. त्यांनी मे महिन्यात अभ्यासात सुरुवात केली होती. टीव्ही किंवा मोबाईल पाहणे त्याने पूर्णपणे टाळलेले होते म्हणूनच त्याला हे यश मिळाले असे तो आवर्जून सांगतो. त्याचा मोठा भाऊ मिरज मेडिकल मध्ये तृतीय वर्षाला असून त्याच्याकडून त्याला अभ्यासाची पद्धती कळाली असे तो आवर्जून सांगतो.