सर्वोदय विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सोयीचं सोहळा व मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला
सर्वोदय विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सोयीचं सोहळा व मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला
मिरज:- संजय पवार
सांगली येथील सर्वोदय विद्यालयात मराठी राज्यभाषा दिन व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेची पूजन संस्थेचे उपाध्यक्ष जी. के. पवार (दादा), सचिव आनंदराव पाटील (काका) खजिनदार तुकाराम पुजारी शाळेच्या मुख्याध्यापिका सुचेता म्हेतर, विजय ओंकार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयातील जेष्ठ शिक्षक अशोक वाघमोडे यांनी केले. मराठी राज्यभाषा दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शब्द पेढी प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या शब्द पेढीत विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंची मांडणी करण्यात आलेली होती. विविध वस्तू त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी नावे इत्यादी गोष्टी विद्यार्थ्याना समजावण्यात मराठी भाषा दिनानिमित्त बरीचशी नावे आपण इंग्रजीत घेतो पण त्यांना मराठीत काय म्हणतात हे माहीत नसते म्हणून हा उपक्रम शाळेत घेण्यात आला. इयत्ता दहावी शुभचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वोदय विद्यालयाचे उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांनी सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे खजिनदार पुजारी सर म्हणाले की विद्यालयात विविध उपक्रम साजरे करण्यात आलेली असतात. तसेच शब्दपेढी या उपक्रमाची संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी विविध प्रकारचे सूचनाही दिल्या परीक्षेत सामोरे जात असताना आपण आपल्यास बरोबर कोणत्या गोष्टी घ्याव्यात,आपल्या शाळेची, संस्थेची बदनामी होणार नाही याची विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी असे आव्हान सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सचिन बाडसर यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. मराठी भाषा दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्या मनस्वी पवार, मानसी पवार, श्रद्धा सावंत, निरव पवार, तुषार वडर, विवेक ठोकळे यांनी मराठी राज्यभाषा दिनानिमित्त कविता, चारोळ्या, महत्व इत्यादीची माहिती देण्यात आली . या कार्यक्रमासाठी संजय पवार, परशुराम रणधीर, शोभा सावंत, हनुमंत हंडगी, सुधीर सोनार, धनराज ठोंबरे, विनोद साळुंखे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव कदम व नसीमा मुकादम यांनी केले तर रणधीर सर यांनी आभार मांडले.