शाहूवाडी तालुक्यातील सहकारी संस्थांच्या तक्रार निवारणासाठी विशेष शिबिराचे आयोजन

शाहूवाडी तालुक्यातील सहकारी संस्थांच्या तक्रार निवारणासाठी विशेष शिबिराचे आयोजन

 कोल्हापूर (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सन 2025 चे औचित्य व जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमानता अभियान अंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील सहकारी संस्थांच्या अनुषंगाने तक्रारीचे निवारण करण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन 4 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत बांबवडे नागरी सहकारी पतसंस्था सभागृह हॉल बांबवडे येथे आयोजन करण्यात आले आहे. 

या विशेष शिबीरात सहकारी संस्था, सभासद, अर्जदार यांनी समक्ष अथवा shahuwadiarcs@gmail.com या ई-मेलद्वारे 4 जुलै पूर्वी अर्ज सादर करावेत. अशा तक्रारीचे निराकरण विशेष शिबीरात करण्यात येणार आहे, असे आवाहन शाहूवाडी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी केले आहे.