डिझाईन ऑफ प्रेस टूल्स कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर आणि इंडो जर्मन टूल्सरूम एक्सटेन्शन कोल्हापूर यांच्यावतीने यंत्र अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतज्ञान प्राप्त होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 31 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले.
विलो माथर अँड प्लांट, गोकुळ शिरगावचे उपकार्यकारी संचालक विजयानंद सोनटक्के यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय गर्गे होते. फाउंड्री विभाग व्यवस्थापक रमेश वाघमारे, मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक संदीप सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक युवराज ढोबळे यांनी प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कसा विनिमय होत आहे याचे स्पष्टीकरण केले. प्राध्यापक प्रमोद शेवाळे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी यशवंत गुरव यांच्यासह विद्यार्थी,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.