शिक्षक हाच खरा समाजाचा मार्गदर्शक : सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे

शिक्षक हाच खरा समाजाचा मार्गदर्शक : सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे

कासेगाव (प्रतिनिधी) :  शिक्षक हाच समाजाचा खरा मार्गदर्शक आहे. नवीन पिढी घडवण्याचे काम शिक्षकच ताकदीने करू शकतो, असे प्रतिपादन कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांनी केले.

कासेगांव (ता वाळवा ) येथे आयोजित कार्यक्रमात वाटेगावचे  सुपुत्र उपक्रमशील शिक्षक सचिन शेवाळे यांना कराड पंचायत समितीच्या वतीने उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा  शिक्षक बँकेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष राजकुमार पाटील होते .

गावडे पुढे म्हणाले,  शिक्षण क्षेत्रात काम करताना आदर्श शिक्षकांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे.  शिक्षक हा समाज व  विद्यार्थी घडवणारा महत्त्वाचा घटक आहे  त्यांना प्रेरणा देण्यासाठी समाजातील विविध घटकाने पुढे येऊन काम केले पाहिजे.  त्यामुळे ते अधिक जोमाने काम करू शकतील . 

याप्रसंगी सचिन शेवाळे, राजकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.  स्वागत -प्रास्ताविक माजी सरपंच पंकज बुरंगे यांनी केले आभार संग्राम कुंभार यांनी मानले. यावेळी  शिक्षक संघाचे  प्रतिनिधी चंद्रकांत गायकवाड ,पोलीस हावलदार  रणजीत पाटील ,विजय पाटील  संभाजी पाटील  ,चंद्रकांत पवार  ,अनिल पाटील  ,सचिन पाटील , संदिप सावंत , दिपक हांडे आदी मान्यवर उपस्थित होते .