'स्टॉप डायरिया' अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

'स्टॉप डायरिया' अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा पाणी स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत आज  'स्टॉप डायरिया' अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. डायरियामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी गाव पातळीवर अभियान यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितांना दिल्या.

या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी,अरुण जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वैजनाथ कराड, शिक्षणाधिकारी प्राथमिक,मीना शेंडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर उपस्थित होते.कार्यशाळेचे प्रास्ताविक जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी केले. या अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजयकुमार पाटील यांनी केले. तर डायरिया बाबत घ्यावयाची खबरदारी या विषयावर डॉ. संजय रणवीर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  या कार्यशाळेसाठी सर्व तालुक्यातून गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उप अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.