राधानगरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस

राधानगरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस

   कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यात काल दिवसभरात राधानगरी तालुक्यात सर्वाधिक 80.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

      जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 22.5 मिमी, शिरोळ -7.9 मिमी, पन्हाळा- 38.8 मिमी, शाहुवाडी- 33.2 मिमी, राधानगरी- 80.2 मिमी, गगनबावडा- 51.5 मिमी, करवीर- 21.8  मिमी, कागल- 25.4 मिमी, गडहिंग्लज- 24.1 मिमी, भुदरगड- 53.8 मिमी, आजरा- 66.9 मिमी, चंदगड- 33.9 मिमी असा एकूण 32.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.