शेतकरी कुटुंबातील विशाल पोळ बनला पोलीस उपनिरीक्षक

शेतकरी कुटुंबातील विशाल पोळ बनला पोलीस उपनिरीक्षक

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी:

जिद्द चिकाटी आत्मविश्वास याच्या जोरावर ग्रामीण भागात शिक्षण घेऊन देऊळगाव राजे येथील शेतकरी कुटुंबातील विशाल ईश्वर पोळ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे, देऊळगाव राजेतील पहिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान विशाल यांनी मिळवला आहे यामुळे परिसरातून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहे, विशाल यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत,माध्यमिक शिक्षण गावातील सिद्धेश्वर विद्यालय येथे झाले तर पुढील शिक्षण दौंड,बारामती येथे झाले,अभ्यासिकेत स्वतः अभ्यास करून विशाल यांनी हे यश मिळवले आहे, गावचे पोलीस पाटील सचिन पोळ,आयटी इंजिनिअर प्रदीप पोळ यांचे ते धाकटे बंधू आहेत,या यशात आई,वडील,भाऊ यांनी अनमोल साथ दिल्याने आपण हे यश मिळवू शकलो असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवून अभ्यास केल्यास नक्कीच यश मिळते हे विशाल यांच्या निवडीने सिद्ध झाले आहे