स्वामी समर्थ गुरुपीठ शिवराजनगर दौंड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

स्वामी समर्थ गुरुपीठ शिवराजनगर दौंड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी:

अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर शाखा शिवराजनगर दौंड येथे प.पु. गुरुमाऊली व आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली 1 मे महाराष्ट्र दिन व ब्रम्हीभुत मोरे दादा पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी समर्थ सेवा केंद्राची वाटचाल 20 टक्के अध्यात्म व 80 टक्के समाजसेवा हा उद्धेश समोर ठेवून सुरू आहे, शिवराजनगर शाखेच्या वतीने विविध सामाजिक,अध्यात्मिक उपक्रम, बालसंस्कार कार्यक्रम आयोजित केले जातात, तरी सर्व नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे