श्री गजानन प्रतीक्षा भक्ती सेवा मंडळ पळसेवाडी बिबवणे तर्फे खास महिला भगिनी सर्धकांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम

श्री गजानन प्रतीक्षा भक्ती सेवा मंडळ पळसेवाडी  बिबवणे तर्फे खास महिला भगिनी सर्धकांसाठी   खेळ पैठणीचा कार्यक्रम

सिंधुदुर्ग प्रतिनिधी :- अमित वेंगुर्लेकर 

कुडाळ : गुरुवार दिनांक 09/11/2023 रोजी श्री गजानन महाराज प्रतिक्षा भक्ती सेवा मंडळ, पळसेवाडी बिबवणे आयोजित संध्याकाळी 7 वाजता खास महिलंसाठी 'खेळ पैठणीचा' हा स्तुत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला  आहे. तरी इच्छुक असलेल्या महिला भगिनी स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा, अशी विनंती मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रा. रुपेश पाटील रंगवणार 'खेळ पैठणीचा' - 

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदक, ज्यांच्या निवेदनाने 'खेळ पैठणीचा' याकार्यक्रमाने सध्या कोकणात एक वेगळी उंची निर्माण केली, असे 'लाडके भाऊजी' प्रा. रुपेश पाटील हे खेळ पैठणीचा कार्यक्रमात रंगत आणणार आहेत. हास्य, विनोद, मनोरंजन आणि ज्ञानाच्या कक्षा वाढवणाऱ्या अभिनव पद्धतीच्या खेळाने खेळ पैठणीच्या कार्यक्रमात रंगत आणली जाणार असल्यामुळे बिबवणे पंचक्रोशीतील महिला - भगिनींनी कार्यक्रमाला सहभाग द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बक्षिसाचे स्वरूप -

प्रथम क्रमांक - आकर्षक पैठणी साडी.

द्वितीय क्रमांक - आकर्षक बक्षीस.

तृतीय क्रमांक - आकर्षक बक्षीस.

स्थळ - श्री. गजानन महाराज प्रतिक्षा भक्ती सेवा मठ, पळसेवाडी बिबवणे, तालुका कुडाळ.संपर्क -

सौ.लीना शिरगावकर - 7066408518,

8010746448.

सौ शिल्पा मांजरेकर, 9689007297 अमिता ठाकूर, 7028916218 शीतल.