'या' चित्रपटात प्रसाद ओकसोबत काम करण्यास अलका कुबल यांनी दिला होता नकार, यामागचं कारण स्पष्टच सांगितलं..

'या' चित्रपटात प्रसाद ओकसोबत काम करण्यास अलका कुबल यांनी दिला होता नकार, यामागचं कारण स्पष्टच सांगितलं..

मुंबई : अलका कुबल या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. माहेरची साडी या चित्रपटामुळे त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. आजही या चित्रपटाची चर्चा होताना दिसून येते. 

 'माहेरची साडी' नाव ऐकलं की, प्रत्येक चाहत्याला अलका कुबल आठवतात. इतकी या सिनेमाची क्रेझ आहे. माहेरची साडीनंतर अलका यांनी, 'माहेरची पाहुणी', 'लेक चालली सासरला', 'नशीबवान', 'बाळाचे बाप ब्रम्हचारी', 'धुमाकूळ' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. 

२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कुंकू लावते माहेरचं' या सिनेमामध्येही अलका कुबल यांनी  मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमात त्यांच्यासोबत प्रसाद ओकने सुद्धा महत्वाची भूमिका साकारली होती.  परंतु  सुरुवातीला अलका यांनी प्रसादसोबत काम करण्यास नकार दिला होता. याच कारण त्यांनी स्वतःएका मुलाखतीत  सांगितलं आहे.

अलका कुबल यांनी नुकतीच एका वृतवाहिनीला  मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांना प्रसाद ओक आणि त्यांचा 'कुंकू लावते माहेरचं' या सिनेमातील एका सीनचा फोट दाखवण्यात आला होता आणि ह्या सीनच्या काही आठवणी असं विचारण्यात आलं. त्यावर अलका म्हणाल्या की, 'कुंकू लावते माहेरचं, प्रसाद ओक हिरो आहे. तो मला वाटतं माझ्याहून सात-आठ वर्षांनी लहान असेल. आणि मी कबूलच नव्हते त्याच्यासोबत काम करायला. मी एकसारखी आमच्या निर्मात्यांना सांगत होते, प्रसादला घेऊ नका माझ्याबरोबर हिरो. तो लहान आहे.'

अलकाताई मी मिशी वाढवतो पण.. 

'प्रसाद तेव्हा नवखा होता. तो मला म्हणाला, "अलकाताई मी मिशी वाढवतो, मी हे करतो पण प्लिज मला काढायला सांगू नका." मला अजून आठवतंय ते सगळं आणि आम्ही दोघांनी ती फिल्म केली होती, खूप चांगली चालली होती.'

आता 'या' सिनेमात दिसणार अलका कुबल 

 अलका कुबल यांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास त्या आता 'मंगला' या सिनेमामध्ये झळकणार असून या सिनेमामध्ये त्यांच्यासोबत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भारतात झालेल्या पहिल्या ऍसिड विक्टिम महिलेवर आधारित हा सिनेमा आहे.