HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

'देवमाणूस' येतोय भेटायला, मालिका नव्हे चित्रपट ; दणक्यात पोस्टर लाँच

'देवमाणूस' येतोय भेटायला, मालिका नव्हे चित्रपट ; दणक्यात पोस्टर लाँच

मुंबई : जानेवारी महिना सुरू झाल्यापासून बऱ्याच सिनेमांच्या घोषणा होऊ लागल्या. तर बरेच सिनेमे रिलीज होऊ लागले. हिंदी सिनेमांच्या तोडीस तोड असलेले मराठी सिनेमे सुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. अशातच आता महेश मांजरेकर यांच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे.

तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट "देवमाणूस" ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच करण्यात आलेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके अशा ह्या दिग्गज आणि पॉवरहाऊस कलाकारांचे वैशिष्ट्य असलेले पोस्टर्स चाहत्यांना सिनेमात असलेल्या त्यांच्या प्रभावशाली स्वरूपाची एक झलक देतात जे नक्कीच उद्या रिलीज होणाऱ्या बहुप्रतिक्षित "देवमाणूस" टीझरच्या अपेक्षा वाढवतात.

महेश मांजरेकर इंटेन्स लुकमध्ये तर रेणुका शहाणे मनमोहक लुकमध्ये 

रिलीझ झालेल्या ह्या पोस्टर्स मध्ये आपण चित्रपटाच्या मुख्य पात्रांचे अतिशय मोहक फर्स्ट लुक पाहू शकतो. अभिनेते महेश मांजरेकर ह्यांचा खूपच साधा पण इंटेन्स लुक आपल्याला दिसून येतो, त्यांची भेदक नजर त्यांच्या या भूमिकेची गंभीरता सांगते. अभिनेत्री रेणुका शहाणे ह्यांचा मायाळू, सरळ देखावा आणि मनमोहक लुक लक्ष वेधून घेणारा आहे तर सुबोध भावे ह्यांना पोलिसांच्या हटके भूमिकेत पाहू शकतो तसेच अभिनेता सिद्धार्थ बोडके त्याच्या हसण्याने सिनेमाचं आणि त्याच्या भूमिकेचं रहस्य वाढवतो. अशा या अनोख्या पोस्टर्समुळे उद्या टीझरमध्ये नक्की काय असणार आहे याची उत्सुकता सर्वांना आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.