चांद्रयान -३ यशस्वी व्हावे यासाठी तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयमध्ये सदिच्छा व प्रार्थना

चांद्रयान -३ यशस्वी व्हावे यासाठी तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयमध्ये सदिच्छा व प्रार्थना
चांद्रयान -३ यशस्वी व्हावे यासाठी तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयमध्ये सदिच्छा व प्रार्थना

कोल्हापूर / प्रतिनिधी

दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रावर यान उतरवणाऱ्या भारताचा जगामध्ये इतिहास निर्माण व्हावा. भारत हा जगोत्तम कामगिरी करणारा देश व्हावा. या विषयाच्या अनुषंगाने चांद्रयान 3 मिशन संपूर्णपणे मोहीम फत्ते होऊन एक नवा अध्याय लिहिला जावा यासाठी आज शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयमध्ये सदिच्छा व प्रार्थना करण्यात आली.

इस्रो व नासा यांच्या कामगिरीला सलाम करण्याकरिता शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आज एकत्रित येऊन प्रार्थना केली. याचे नेतृत्व अभियांत्रिकेचे प्राचार्य डॉ. रणजीत सावंत, प्रबंधक मेहजबीन म्हैशाळे यांनी केले.

या मोहिमेची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ निदेशक दत्ता सुतार यांनी दिली. मोहीम यशस्वी करिता मदन कवडे यांनी प्रार्थना व्यक्त केली. यावेळी प्रभाकर शेडबाळे, विनायक मिरजे, जे. के. केरुरकर, हेमा  भांभुरे, आरती जोशी, प्रभाकर शेडबाळे, कुलदीप कोकरे, शिवा कोळी यांच्यासह दोन्ही संस्थांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.