मलकापूर नगरपालिकेचे अन्यायकारक शुल्क आकारणी

मलकापूर नगरपालिकेचे अन्यायकारक शुल्क आकारणी

मलकापूर नगरपालिकेचे अन्यायकारक शुल्क आकारणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते


मलकापूर नगरपालिकेने कचरा संकलन कर आकारण्यात आलेल्या शुल्कापोटी जी रक्कम आकारण्यात आली आहे ती केलेली वाढ, अन्यायकारक असल्याचे नागरिकांनी सांगितले. मागील वर्षी कर आकारणी ही ५० रुपये होती. यावर्षी हीच आकारणे 540 रुपये करण्यात आली व ती नागरिकांवर अन्यायकारक आहे. नगररचना यांनी मूल्य निर्धारण विभाग, सहाय्यक संचालक कोल्हापूर यांनी दिनांक 11/10/2022 रोजी 2025 व 2026 सालापर्यंत कुठल्याही प्रकारची कर आकारणी करू नये, असे पत्र मलकापूर नगरपालिकेत दिले आहे. ही अन्यायकारक वाढ रद्द करावी, अन्यथा मलकापूरचे मिळकत धारक उग्र आंदोलन करण्याची व मलकापूर नगरपालिका मलकापूर मुख्याधिकारी यांना निवेदन देताना ही माहिती देण्यात आली.

यावेळी उपस्थित - माजी नगराध्यक्ष दिनेश सक्रे, शेकापा तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमाने, दस्तगीर अत्तार, भाई पाथरे, उमेश कोठावळे, दीपक चेणे, चेतन गुजर, महेश गांगण व नागरिक उपस्थित होते.