रोटी डे उपक्रमाला अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर यांच्या कडून एक हात मदतीचा

रोटी डे उपक्रमाला अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर यांच्या कडून एक हात मदतीचा

रोटी डे उपक्रमाला अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर यांच्या कडून एक हात मदतीचा

एक घास प्रेमाचा एक घास भुकेलेल्यांसाठी......

कोल्हापूर युथ मुव्हमेंट तर्फे २०१८ सालापासून रोटी डे हा सामजिक उपक्रम राबविला जातो. दर वर्षी फेब्रुवारी च्या तिसऱ्या रविवारी हा उपक्रमबिंदू चौक येथे राबविला जातो. येथे अन्न, धान्य, वस्त्र भात, भाजी,आमटी, शिरा,उपमा आदी दान केले जाते. तांदूळ, साखर, ज्वारी,मका, बाजरी, गहू, चटणी, मीठ, कोरडा खाऊ, बिस्किटे आदी दान म्हणून देण्यात आली. ही वस्तू स्वरूपात आलेली मदत आनाथाष्रम, कुष्ठ रोग धाम, अंध शाळा, खेडो पाडी डोंगराळ भागात असलेल्या वस्त्या, दुर्गम भाग, कोल्हापुरातील झोपडपट्टी भाग येथे जाऊन ते दिले जाते. सोशल मीडिया च्या माध्यमातून हा उपक्रम लोकांपर्यंत पोहचवला जातो. आज आजम जमादार भाजपा जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर यांनीही येथे खारीचा वाटा मदत म्हणून दिली. 

यावेळी शाहरुख गडवाले भाजपा जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर, छाया साळुंखे, कोल्हापूर युथ मुव्हमेंट च्या अध्यक्षा सौ. ज्योती चौगुले, सौ. नीलंबरी जांभळे, समीर जमादार सचिव तथा संस्थापक अध्यक्ष सरकार प्रतिष्ठान कोल्हापूर, सौ. वसुधा निंबाळकर खाजानीस, शीतल पंदारे सचिव, स्नेहल शिर्के महासचिव, यासिन सय्यद जिल्हा उपाध्यक्ष सरकार प्रतिष्ठान कोल्हापूर, निलेश बनसोडे, अक्षय चौगले, प्रणव कांबळे, शिवराम बुध्याळकर, पंकज आठवले आदी उपस्थित होते.