HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला नॅककडून मानांकन

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला नॅककडून मानांकन

साळोखेनगर प्रतिनिधी : डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला 'राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदे'चे (NAAC) प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे.

हे मानांकन पाच वर्षासाठी म्हणजे डिसेंबर 2029 पर्यंतच्या कालावधीसाठी मिळाले आहे. यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती डी. वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डी. ए.के गुप्ता यांनी दिली. 

  'नॅक' मूल्यांकन समितीने अभ्यासक्रम पद्धत, मूल्यांकन पद्धत, संशोधनात्मक काम ,पायाभूत सुविधा, प्राध्यापकांची संख्या, विविध विषयांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंट सुविधा आदींची माहिती घेतली. समितीने मूल्यांकन करून अखेर पाच वर्षासाठी मानांकन जाहीर केल्याचे कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने यांनी सांगितले

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश माने म्हणाले 2014 मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने पहिल्याच प्रयत्नात मानांकन मिळवले आहे .या मानांकनामुळे संस्थेच्या शिक्षणाची गुणवत्ता, संशोधन कार्य, पायाभूत सुविधा व विद्यार्थी विकासाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. या यशामध्ये प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी, पालक यांचा मोठा वाटा आहे.

 संस्थचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.