HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

नतमस्तक व्हावेत असे पाय सापडत नाहीत: मधुकर किरुळकर यांचे प्रतिपादन

नतमस्तक व्हावेत असे पाय सापडत नाहीत: मधुकर किरुळकर यांचे प्रतिपादन
आवळी बुद्रुक: पारितोषिक वितरण समारंभात बोलताना पत्रकार मधुकर किरुळकर. शेजारी इतर मान्यवर.

नतमस्तक व्हावेत असे पाय सापडत नाहीत: मधुकर किरुळकर यांचे प्रतिपादन

[माध्यमिक विद्यालय पारितोषिक वितरण व सत्कार प्रसंगी!

गुडाळ वार्ताहर/ संभाजी कांबळे 

    

नतमस्तक होऊन ज्यांचे पाय धरावे असे पाय लोभी व स्वार्थी जगात सापडत नाहीत, अशी खंत पत्रकार मधुकर किरुळकर यांनी व्यक्त केली.

  आवळी बुद्रुक ता. राधानगरी येथील माध्यमिक विद्यालयात पारितोषिक वितरण सत्कार व सदिच्छा अशा संयुक्त समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे संचालक बी. आर. पाटील होते.

    जुन्या काळातील आदर्श व्यक्तींचे संस्कार नव्या पिढीने आचरण करण्याची गरज व्यक्त करून पत्रकार किरूळकर पुढे म्हणाले, टीव्ही, सोशल मीडियाचा योग्य तेवढाच वापर करून विद्यार्थ्यांनी स्वतःला सावरावे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आई, वडील व गुरुजनांची जाणीव ठेवून निश्चित ध्येयासाठी कष्ट करावे. 

   स्वागत व्ही.एस. किरुळकर व प्रास्ताविक डी. आर. पोवार यांनी केले. यावेळी माजी सरपंच सर्जेराव कवडे अध्यक्ष बी. आर. पाटील मुख्याध्यापक कोतेकर, विद्यार्थी यांनी भाषणे केली. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी, नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

   कार्यक्रमास सरपंच अस्मिता सुतार, उपसरपंच श्वेता पाटील, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष आनंदराव कवडे, मिलिंद पाटील, धनाजी कवडे, सुदाम कांबळे, विष्णू कवडे, पांडुरंग पाटील, नामदेव पोवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. आभार स्वप्निल भोपळे यांनी मानले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.