Mumbai Crime : पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केला पतीचा गेम; मृतदेह फेकला खाडीत

मुंबई : मुंबईतील बाळकुम येथे एका विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला भरपूर मद्य पाजून मद्यधुंद अवस्थेत खाडीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला तिने पोलिसांकडे पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी तपास करताना तिच्यावर संशय घेतल्याने सखोल चौकशी करण्यात आली आणि खऱ्या घटनेचा उलगडा झाला.
या प्रकरणात आरोपी महिला रबाळे एमआयडीसीतील आंबेडकर नगरमध्ये आपल्या पती कालिदास (३०) आणि दोन मुलांसह राहत होती. पतीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून तिने प्रियकर सुरेश यादव (२४) याच्यासह कट रचला. १६ मे रोजी कालिदासला भरपूर दारु पाजण्यात आली आणि मद्यधुंद अवस्थेत त्याला रिक्षाद्वारे बाळकुम येथील खाडीमध्ये नेऊन फेकण्यात आले. पोलिसांनी या दोघांना अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.