राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त "चमत्कारांची दुनिया आणि विज्ञानाची किमया" या खास कार्यक्रमाचे आयोजन
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त "चमत्कारांची दुनिया आणि विज्ञानाची किमया" या खास कार्यक्रमाचे आयोजन
सेलू प्रतिनिधी :-
श्रीराम प्रतिष्ठान संचालित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज विद्या विहार संकुल रवळगाव रोड सेलू येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शहाजी भोसले प्रस्तुत चमत्काराची दुनिया आणि विज्ञानाची किमया व कौन बनेगा करोडपती फेम दामोदर आवटे यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन 28 फेब्रुवारी मंगळवार रोजी सकाळी ९.३० वाजता केले आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून प्रिन्स इंग्लिश स्कूल ज्ञानतीर्थ विद्यालय प्रॉस्परस पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये चमत्काराची दुनिया व विज्ञानाची किमया शहाजी भोसले अंधश्रद्धा निर्मूलन समिती सरचिटणीस महाराष्ट्र राज्य यांचे अंधश्रद्धेवर आधारित विविध प्रात्यक्षिक सादरीकरण होणार आहे यामध्ये पाण्याने दिवा पेटवणे, नारळाला आग लावणे, तोंडामध्ये पेटवलेला कापूर ठेवणे इत्यादी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण व समाज प्रबोधन ते करणार आहेत.
तसेच कौन बनेगा करोडपती फेम दामोदर आवटे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी सुद्धा विद्यार्थी संवाद साधणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन, पोस्टर मेकिंग, पावर पॉइंट प्रेझेंटेशन, वैज्ञानिक रांगोळी, वैज्ञानिक व्हिडिओ असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
श्रीराम प्रतिष्ठान सेलू चे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.