NEET-UG पेपर लीक मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग!

NEET-UG पेपर लीक मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग!

18 व्या लोकसभेच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात झाली. या सत्रात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कथित नीट यूजी पेपर लीकवर एक दिवसीय चर्चेची मागणी केली होती. परंतु, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या मागणीला स्पष्ट नकार दिला. यानंतर विरोधकांनी निषेध म्हणून सोमवारी लोकसभेतून सभा त्याग केला.

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी पुन्हा एकदा नीट पेपर फुटी चर्चेचा मुद्दा संसद सभागृहात उपस्थित केला. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले "आम्हाला नीट वर एक दिवशी चर्चा हवी आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा असून दोन कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फटका बसलाय. 70 वेळा पेपर लीक झाले आहेत. त्यामुळे या विषयावर स्वतंत्र चर्चेला परवानगी दिलास आम्हाला आनंद होईल" असेही राहुल गांधी म्हणाले. परंतु, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या मागणीला स्पष्ट नकार दिला.