पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार!

पंजाब वृत्त संस्था : पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केला. सुखबीर बादल थोडक्यात बचावले असून हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे.
सोमवारी ‘अकाल तख्त’कडून धार्मिक शिक्षेनंतर व्हीलचेअरवर सेवा देणाऱ्या बादल यांच्यावर गोळीबार करण्यात आला. घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव नारायण सिंग चौरा असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकले नाही असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.