Supreem Court CJI : न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे ५२ वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली : न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. अनुसूचित जाती वर्गातील केवळ दुसरे आणि देशाचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश ठरण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. महाराष्ट्रातील अमरावती येथून आलेल्या गवई यांच्या या निवडीमुळे संपूर्ण राज्यात तसेच देशभरातून आनंद व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रपती भवनात बी आर गवईंचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी बी आर गवईंना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. संविधानाच्या कलम १२४(२) अंतर्गत त्यांचे नियुक्तीपत्रक काढण्यात आले, ज्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब त्यांची अधिकृत नियुक्ती मान्य केली आहे.
मे २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयात रुजू झाल्यापासूनच त्यांनी देशासाठी प्रमुख निर्णयांत महत्वाची भूमिका बजावली. गेल्या ६ वर्षांत त्यांनी ७०० खंडपीठांत हे सहभागी होते. ज्यामधून त्यांनी जवळपास ३०० निर्णय घेतले आहेत. त्यांचे न्यायलयीन व्यापक आहे. त्यांनी प्रशासकीय बाबींपासून ते दिवाणी, फौजदारी, व्यावसायिक आणि पर्यावरणीय कायद्यांसाठी उल्लेखनीय निर्णय घेतले आहेत. न्यायमूर्ती गवईं ऐतिहासिक निर्णयांचा आदर्श देशासमोर ठेवतील.