HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सीबीएसई 10 वी परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे भव्य यश

सीबीएसई 10 वी परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे भव्य यश

अतिग्रे -  संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने ऑल इंडिया सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन (AISSE) 2025 मध्ये शानदार कामगिरी करत 100% निकालाची परंपरा कायम ठेवली. शाळेच्या एकूण 466 विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला असून, त्यातील 146 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवत यशाचे शिखर गाठले.

सविस्तर निकाल - 

प्रथम क्रमांक (98.8%) – तनिष्का सुरेश कदम, पार्थ राजेंद्र शेळके

द्वितीय क्रमांक (98.6%) – अनय अवधूत देशपांडे, आर्या समीर नवारे

तृतीय क्रमांक (98.4%) – मनस्वी किरण पाटील, सुहानी महेश कांडोई, मान्या सारडा, क्रिशा देसाई, अथर्व श्रीमंत सालगरे

निकालाचे विश्लेषण - 

90% पेक्षा अधिक गुण – 146 विद्यार्थी

80% ते 90% गुण – 138 विद्यार्थी

70% ते 80% गुण – 106 विद्यार्थी

काही विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली - 

संस्कृत – 14 विद्यार्थी

मराठी – 4 विद्यार्थी

फ्रेंच – 3 विद्यार्थी

गणित – 2 विद्यार्थी

विज्ञान – 1 विद्यार्थी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स – 61 विद्यार्थी

"विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांना आमच्या गुणवत्तापूर्ण अध्यापन प्रणालीचा भक्कम पाठिंबा लाभल्यामुळेच हे यश शक्य झाले," असे प्रतिपादन यावेळी बोलताना संचालिका सस्मिता मोहंती यांनी व्यक्त केले.

बोर्डिंग विभागाचे प्राचार्य, डॉ. एच.एम. नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली सर्व शिक्षकवर्ग व पालकांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.