HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

Youth Death Kolhapur : कामोत्तेजक गोळ्यांच्या जादा सेवनाने घेतला तरुणाचा बळी

Youth Death Kolhapur : कामोत्तेजक गोळ्यांच्या जादा सेवनाने घेतला तरुणाचा बळी

कोल्हापूर : कामोत्तेजक गोळ्यांचे जादा सेवन केल्याने कोल्हापुरात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  बेशुद्ध झालेल्या या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. नेमका मृत्यू कशामुळे झाले शुक्रवार पर्यंत स्पष्ट झालं नव्हतं. 

काही दिवसांपूर्वी हा तरुण नोकरीला लागला होता. मौजमजा करण्यासाठी मित्रांसोबत स्टेशन रोडवर तो आला होता. मद्यप्राशन केल्यानंतर एका टपरीवर त्यांनी खाद्यपदार्थ घेतले. मध्यरात्री उशिरा 25 वर्षीय तरुण स्टेशन रोडवरील एका लॉजवर गेला तर मित्र रस्त्यावरच थांबून त्याची वाट पाहत होता. 

मित्र खूप वेळ झाला तरी बाहेर आला नाही म्हणून काही काळानंतर मित्र चौकशीसाठी खोलीमध्ये गेला असता तो बेशुद्ध अवस्थेत आणि विवस्त्र स्थितीत आढळला.  मध्यरात्री त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. तरुणाने कामोत्तेजक गोळ्यांचे जादा सेवन केल्यामुळे हा प्रकार घडला असावा अशी रुग्णालयात चर्चा होती. आता शवविच्छेदनाचा स्पष्ट अहवाल हाती आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे सांगण्यात आले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.