शिवाई ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त शिव वंदने द्वारे अभिवादन

शिवाई ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना  जयंतीनिमित्त शिव वंदने द्वारे अभिवादन

शिवाई ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना  जयंतीनिमित्त शिव वंदने द्वारे अभिवादन  

कोल्हापूर प्रतिनिधी:

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्तरेश्वर पेठ शुक्रवार पेठ येथील शिवाई ग्रुपच्या वतीने बाल मावळे रणरागिणी यांनी पारंपारिक वेशात छत्रपती शिवाजी चौकातील जन्मोत्सवात शिव वंदना सादर करून अभिवादन केल.यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे छत्रपती शाहू महाराज, खासदार संजय मंडलिक ,आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयश्री जाधव ,आयुक्त कादंबरी बलकवडे, दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक योगेश जाधव यांनी सर्व बाल मावळे रणरागिणी यांचे कौतुक केले.

 

 या उपक्रमात मार्गदर्शिका यशश्री किशोर घाटगे यांच्यासह प्रतीक घाटगे, रुद्र ओतारी, वैभवी घाटगे, आयुष कदम, प्रांजल पाटील ,श्रेया शिंदे, भक्ती पाटील, यासह पन्नास हुन अधिक बाल मावळे व रणरागिनी सहभाग नोंदवला.यावेळी माजी महापौर आर के पवार, शहाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष उदय शिंदे ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे ,काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक आदिल फरास ,मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यासह विविध मान्यवर उपस्थित होते .